उस्ताद लहुजी साळवे
लहुजी राघोजी साळवे : (१४ नोव्हेंबर १७९४–१७ फेब्रुवारी १८८१). एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहुजीबुआ, लहुजी वस्ताद या नावांनीही ते परिचित होते आणि त्यांचे घराणे ‘ राऊत’ या नावाने ख्यातनाम होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) येथे राघोजी व विठाबाई या दांपत्यापोटी झाला. साळवे हे पराक्रमी घराणे असून छ. शिवाजी महाराजांनी लहुमांग यांस (लहुजींचे आजोबा) ‘राऊत’ ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती. लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते, शिवाय शस्त्रागारखात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. खडकीच्या युद्घात पेशवाईचा अस्त झाला. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्घ लढताना ते धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला. त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा (तालीम) सुरु केली (१८२३), शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरा
Comments
Post a Comment