नटसम्राट काळाच्या पडद्याआड डॉक्टर तसेच ज्येष्ठ कलाकार श्रीराम लागू यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ही बातमी ऐकून धक्काच बसला. कला क्षेत्रात अव्वल भूमिका बजावणारे. पिंजरा या मराठी चित्रपटातून समाजाचे दर्शन जागा समोर ठेवणारे व्यक्तिमत्व आज हरपले. शांत संयमी आणि आभ्यासू व्यक्तिमत्व असणारे कलाकार म्हणून ते खूप प्रसिद्ध होते. वाचन आणि लिखाण या गोष्टी च आचुक संगम यांच्या मध्ये दिसतो.. आज या घडीला एक प्रसंग मला आवरजून सांगावासा वाटतो.. साधारण पणे २०१७ मध्ये काही कंपनीच्या कामानिमित्त कोथरुड येथील एका खाजगी संस्थे मध्ये जाणाच्या योग आला होता. मी माझे काम आवरून सायकाळी ५ वाजता काम उरकून वापस घराकडे निघालो. संस्थे च्या सभोवताली सुशोभित बगीचा आहे. या बागेत नित्य नियमाने श्रीराम सर वॉक करत असत. माझी नजर त्यांच्या वर गेली मला मोह आवरला नाही.. मी त्यांना वेळ मागितला. तर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता "हो बोला " असे उदगार दिले आणि जवळ असलेल्या कट्टा कडे बोट करून आपण तिथे बसू आणि बोलायला सुरुवात झाली.. सर्वप्रथम मी माझी ओळख करून दिली. माझे काम कंपनी आणि इ...
लहुजी राघोजी साळवे : (१४ नोव्हेंबर १७९४–१७ फेब्रुवारी १८८१). एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहुजीबुआ, लहुजी वस्ताद या नावांनीही ते परिचित होते आणि त्यांचे घराणे ‘ राऊत’ या नावाने ख्यातनाम होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) येथे राघोजी व विठाबाई या दांपत्यापोटी झाला. साळवे हे पराक्रमी घराणे असून छ. शिवाजी महाराजांनी लहुमांग यांस (लहुजींचे आजोबा) ‘राऊत’ ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती. लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते, शिवाय शस्त्रागारखात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. खडकीच्या युद्घात पेशवाईचा अस्त झाला. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्घ लढताना ते धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला. त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा (तालीम) सुरु केली (१८२३), शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी पर...
Good job
ReplyDeleteMast
ReplyDelete