नटसम्राट काळाच्या पडद्याआड

नटसम्राट काळाच्या पडद्याआड


डॉक्टर  तसेच ज्येष्ठ कलाकार श्रीराम लागू यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.

ही बातमी ऐकून धक्काच बसला.
कला क्षेत्रात अव्वल भूमिका बजावणारे. पिंजरा या मराठी चित्रपटातून समाजाचे दर्शन जागा समोर ठेवणारे व्यक्तिमत्व आज हरपले.  शांत संयमी आणि आभ्यासू व्यक्तिमत्व असणारे कलाकार म्हणून ते खूप प्रसिद्ध होते. वाचन आणि लिखाण या गोष्टी च आचुक संगम यांच्या मध्ये दिसतो..

आज या घडीला एक प्रसंग मला आवरजून सांगावासा वाटतो.. साधारण पणे २०१७ मध्ये काही कंपनीच्या कामानिमित्त कोथरुड येथील एका खाजगी संस्थे मध्ये जाणाच्या योग आला होता. मी माझे काम आवरून सायकाळी ५ वाजता काम उरकून वापस घराकडे निघालो.  संस्थे च्या सभोवताली सुशोभित बगीचा आहे. या बागेत नित्य नियमाने श्रीराम सर वॉक करत असत. माझी नजर त्यांच्या वर गेली मला मोह आवरला नाही.. मी त्यांना वेळ मागितला. तर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता "हो बोला " असे उदगार दिले आणि जवळ असलेल्या कट्टा कडे बोट करून आपण तिथे बसू  आणि  बोलायला सुरुवात झाली..
सर्वप्रथम मी माझी ओळख करून दिली. माझे काम कंपनी आणि इतर गोष्टी विचारल्या.. मला खूप आनंद झाला होता की सिनेजगतात ला थोर कलाकार आपुलकीने माझी विचारपूस करत होता. या नंतर त्यांना मी काही प्रश्न विचारले.. त्यानी त्याची उत्तरे दिली. हा अनुभव अतुलनीय होता..
असा सामान्य कलाकाराच्या आत्म्याला शांती प्राप्त होवो.

Comments

Popular posts from this blog

उस्ताद लहुजी साळवे

स्वप्नातला राजा